Monday, June 15, 2026
Latest NewsSports

पहिल्या पुणे ओपन 2000 खालील फिडे रेटिंग बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अहमदाबादच्या सोहिल शेख याला विजेतेपद

पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या पुणे ओपन 2000 खालील फिडे रेटिंग बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नवव्या फेरीत अहमदाबादच्या सोहिल शेख याने 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावत विजेतेपद संपादन केले.
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत अहमदाबादच्या सोहिल शेखने अर्णव नानलला बरोबरी साधत 8 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. सोहिल याने कॅरो कॅन एकसेंज व्हेरिएशनने आपल्या डावास सुरुवात केली व 30 चालींमध्ये अर्णववर बरोबरी साधली. सोहिल हा मिरझापुर येथील  सिटी सीयू शहा कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत एमकॉमच्या पहिल्या वर्षाला शिकत असून मिर्झापुर चेस क्लब येथे सराव करतो. अलिबागच्या साई बलकवडे याने कोल्हापुरच्या अनिकेत बापटला बरोबरीत रोखले व 7.5गुणांसह दुसरे स्थान पटकावले. पुण्याच्या अर्णव नानल याने 7.5 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.
 
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक, प्रशस्तीपत्रक व 1लाख रुपये, उपविजेत्या खेळाडूला करंडक, प्रशस्तीपत्रक व 85हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, बडवे इंडस्ट्रीजचे श्रीकांत बडवे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रॅन्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे मानद सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर पॉल आरोकिया राज, राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: नववी फेरी(व्हाईट व ब्लॅक या नुसार):
सोहिल शेख(भारत)(8गुण) बरोबरी वि.अर्णव नानल(भारत)(7.5गुण);
अनिकेत बापट(भारत)(7.5गुण) बरोबरी वि.साई बलकवडे(भारत)(7.5गुण);
ऋतुराज धोत्रे(भारत)(7.5गुण) बरोबरी वि.नमित चव्हाण(भारत)(7गुण);
श्रयन मजुमदार(भारत)(7गुण) बरोबरी वि. एजीएम प्रशांत नाईक(भारत)(7गुण);
गजानन जायदे(भारत)(7गुण) बरोबरी वि.जिहान शहा(भारत)(7गुण);
समीर इनामदार(भारत)(7गुण)बरोबरी वि.शिवथानूजन एस(श्रीलंका)(7गुण);
मिहीर सरवदे(भारत)(6.5गुण) पराभूत वि.विश्रुत पारेख(भारत)(7गुण);
मानस गायकवाड(भारत)(6गुण)पराभूत वि.एआयएम सूरज एमआर(भारत)(7गुण);
अंकित चुडासामा(भारत)(6गुण) पराभूत वि.दिशांक बजाज(भारत)(7गुण);
गौरव दास(भारत)(7गुण) वि.वि.ध्रुव हळदणकर(भारत)(6गुण);
विग्नेश्वरन एस(भारत)(6.5गुण) बरोबरी वि.विनीत धूत(भारत)(6.5गुण);
एके जगदीश(भारत)(6.5गुण) बरोबरी वि.विवान शहा(भारत)(6.5गुण).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading