राज्यात मास्क सक्ती नाही – आरोग्य मंत्री राजेश टोपे
पुणे : राज्यात कोरोना रुग्ण गेल्या काही दिवसांपासून वाढत असून रुग्णसंख्या हजाराच्यावर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आरोग्य विभागाने राज्यात मास्क वापरण्यासंदर्भात सुचना जारी केल्या आहेत. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने MUST हा शब्द वापरला तरी, राज्यात मास्क सक्ती नाही. मात्र मास्क वापरण्याचे हे आवाहन करण्यात आले आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
राज्यातील काही जिल्ह्यांपूर्ता कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. यात मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला धरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाने एक पत्र पाठवले होते. या पत्रात संबंधित जिल्ह्यांपूर्ती कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी उपाययोजना लागू करण्याच्या सुचना केल्या आहेत. टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरलं आहे की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतेय त्याठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करावे. हा अपील करण्याचा मुद्दा आहे. 100 टक्के मास्क वापरलाच पाहिजे. अशी सक्ती नाही,” असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे.
10 ते 15 दिवस जी सध्या कोरोनाची सर्ज आलेली आहे. त्यादृष्टीकोनातून तरी बंदिस्त ठिकाणी म्हणजे बस, शाळा, रेल्वे, ऑफिससेची ठिकाणं या ठिकाणी मास्क वापरावा. खुल्या ठिकाणी त्याला थोडी शिथिलता असली तरी हरकत नाही. जोडून लसीकरण करा, पहिला आणि दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले असली तर बुस्टर डोस घ्यायला हरकत नाही. अशा प्रकारच्याही सुचना देण्यात आल्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं टेस्टिंग वाढवा. एक मोठी तीन पानांची नोटचं आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जी सर्व महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ज्यातून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
