Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

संत संगतीमुळे माणसातील वासनांचा क्षय – कीर्तनकार ह.भ.प. मंदारबुवा गोखले 

पुणे : राम नाम सोपे आहे, परंतु ते पूर्वपुण्य असल्याशिवाय मिळत नाही. पूर्व पुण्य गाठीशी असेल तर संतांची संगती लाभते. संतांच्या संगतीत गेल्यावर संत तुमच्यातील वासना नाहीशा करतात आणि माणसातील वासनांचा क्षय होतो. त्यामुळे संत हे पृथ्वीवरील चालते बोलते परमेश्वर आहेत, असे मत कीर्तनकार ह.भ.प. मंदारबुवा गोखले यांनी व्यक्त केले.

श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात अपरा एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

मंदारबुवा गोखले म्हणाले, वासनांचा क्षय झाल्यानंतर जे मुखातून राम नाम येते ते सोपे आणि सुलभ आहे, असे तुकोबाराय म्हणतात. राम नाम मुखात येऊ लागले की, जीवनातील सुख घडोघडी वाढू लागते. राग, लोभ, मत्सर न करणारा व्यक्ती म्हणजे संत. दु:ख नाहीसे करायचे असेल तर संतांची संगती हवी. जिथे संतांचे चरण स्पर्श होतात तिथे सुखाचा काळ सुरू होतो

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading