fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

यावेळीही तिसरी जागा भाजपाच निवडून येणार- प्रवीण दरेकर

पुणे:सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवस आहे मात्र अद्याप दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सहाव्या जागेसाठी निवडणूक घेण्याची शक्यता आहे. त्यावर मागील वर्षीप्रमाणेच यावेळीही भाजपाचे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.  प्रवीण दरेकर म्हणाले,पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. जिथे जिथे त्या गेल्या आहेत, तिथे त्यांनी संधीच सोनं करुन दाखवलं आहे. त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत तिथे त्यांनी चांगलं संघटन केलं आहे, पंकजा मुंडे यांच्याराज्यसभेच्या उमेदवारीबद्दल विचारले असता प्रवीण दरेकर म्हणाले, हा निर्णय वरिष्ठ घेत असतात मोठ्या नेत्यांवर बोलणं उचित नाही. असे दरेकर म्हणाले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असे बोलण्याऐवजी रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी’, असं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. प्रवीण दरेकरांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, रोहित पवारांनी आधी त्यांच्या घरातील अजित पवार, सुप्रिया सुळे की ते स्वतः मुख्यमंत्री होणार, यावर एकमत करा आणि मग हयात नसलेल्यांशिषयी बोलावे.असा टोलाही लगावलाय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading