Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘इर्सल’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित  

‘इर्सल’ ही आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढा देणाऱ्या माणसांची गोष्ट आहे, जी आजपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. समाजकारण करणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय महत्वाकांक्षा, त्यातून घडणार्‍या अनपेक्षित घडामोडी, त्याचबरोबर राजकारणातील कावेबाज माणसांच्या इर्षेची धूळवड नेमकी कशी रंगते,  स्थानिक पुढारी आणि गुंडगिरी यांचे पडद्यामागील मैत्रीचे धागे नेमके कसे असतात आणि त्यांचे परिणाम, यांचा रंजक थरार अनिकेत बोंद्रे – विश्वास सुतार दिग्दर्शित ‘इर्सल’ या पॉलिटिकल थ्रीलर मराठी चित्रपटात बघायला मिळणार आहे. 

राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘इर्सल’चे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत. ‘इर्सल’ चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत. तर ट्रेलर आणि गाण्यांमधून लक्षवेधून घेणारी  विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी पदार्पण करत आहे.

भलरी प्रोडक्शनची निर्मिती आणि सूरज डोंगळे यांच्या राज फिल्मची प्रस्तूती असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटाला दिनकर शिर्के यांचे गीत – संगीत लाभले आहे. चित्रपटातील गाणी पूरण शिवा, ऊर्मिला धनगर, गुल सक्सेना, शाहीर लक्ष्मण पवार यांनी गायली आहेत.  तर नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आहेत. कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची, तर संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित ‘इर्सल’ चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading