Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेस कडून तिरडी आंदोलन

पुणे :भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन करत महागाईचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.
काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सेनापती बापट रस्ता येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी सोमवारी सकाळी स्मृती इराणी उपस्थित होत्या.दरम्यान या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. यावेळी चतु:शृंगी पोलिसांनी कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठीही स्मृती इराणी यांना आमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी पावणे पाच वाजता झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली शंभर ते दीडशे महिलांनी तिरडी आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, मनीष आनंद, कमल व्यवहारे,संगीता तिवारी वैशाली मराठे,सुजाता शेट्टी, मीरा शिंदे आदींनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading