Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

३४ गावातील अन्यायकारक कर कमी करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समीतीचे साकडे

पुणे: ग्रामपंचायती पेक्षा अधिक रक्कमेच्या अन्यायकारक मिळकत कर तसेच पाणी टंचाई व इतर सुविधां अभावी ३४ गावांतील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. अन्यायकारक मिळकत कर कमी करावे असे साकडे सर्व पक्षीय हवेली तालुका हवेली कृती समीतीने.महापालिका प्रशासनाला घातले आहे. तातडीने दखल न घेतल्यास जन आंदोलनाचा इशाराही समितीने दिला आहे.
माजी विरोधी पक्ष नेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखालील समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, पोपटराव खेडेकर, संतोष ताठे आदी पदाधिकाऱ्यांनी पालीकेचे कर संकलन प्रमुख देशमुख यांची भेट घेतली. त्यांना पालीका प्रशासनाने नव्याने समाविष्ट केलेल्या ३४ गावात मिळकतकरांची अन्य्यायकारक आकारणीची माहिती दिली.ग्रामपंचायत करापेक्षा तीन ते पाच पट अधिक कर आकारणी केली आहे. या गावात अद्याप पालिकेने पाणी, रस्ते ,आरोग्य अशा मुलभूत सुविधा पुरविल्या नाहीत . मिळकत कोणत्या भागात आहे. त्यानुसार कर आकारणी केली नाही. सुविधा न देता भरमसाठ कराची वसुली केली जात आहे. कराच्या वसुलीसाठी वांरवार नोटीसा दिल्या जात आहेत. भरमसाठ करांमुळे अनेकांवर मिळकती विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
कृती समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, कायद्या नुसार जो पर्यंत शहराच्या दर्जाच्या सुविधा नागरिकांना मिळत नाही तो पर्यंत शहराप्रमाणे मिळकत कर घेण्याचा अधिकार पालिकेला नाही . असे आहे. असे असताना भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करून पालिका अन्यायकारकपणे कर वसुली केली जात आहे.
शहराच्या मध्यभागा प्रमाणे १०-१५ किलोमीटर दुर असलेल्या समाविष्ट गावात.
सरसकट मिळकतकरांची आकारणी केली आहे. शहरातील व गावातील बांधकामाच्या किमंतीत पन्नास ते ऐंशी टक्के फरक आहे. मात्र गावातील मिळकतीचे अधिक कर आहे.टॅक्स आकारणी केली आहे.अन्यायकारक करा बाबत मुख्य सभेमध्ये मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी व भरमसाट जाचक करातून नागरिकांची सुटका करावी . पालीकेचे कर संकलन प्रमुख देशमुख यांना निवेदन देताना आबा बागुल, श्रीरंग चव्हाण पाटील व इतर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading