fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

मराठी विज्ञान परिषद संस्थापक म.ना.गोगटे यांचे निधन

पुणे : मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म.ना.गोगटे यांचे पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. ते म.ना. नावाने प्रसिद्ध होते. 1932 साली  मुंबई येथे जन्माला आलेले म.ना. यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बी.ई. (स्थापत्य अभियांत्रिकी) आणि लंडन विद्यापीठामधून एम.एस्सी. (अभियांत्रिकी) ही पदवी मिळविली. त्यांनी चाळीस वर्षे
वास्तुविशारद, व्हॅल्युअर आणि स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये स्वत:चा व्यवसाय केला. मराठीतून विज्ञान प्रसार करणाऱ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले. मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्यकर्त्यांची सांधेजोड करण्याचे काम केले. गेली 25 वर्षे ते पुणे येथे स्थायिक होते. मराठी भाषेत ऑ आणि ॲ हे स्वर स्वीकारले जावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. तसेच रोमन लिपीचा पुरस्कार त्यांनी केला होता. पूर्ण नावात आईचा उल्लेख असावा यासाठी त्यांनी आपले नाव – मधुकर इंदिरा नारायण असे लिहायला 45 वर्षांपासून सुरूवात केली.
त्यांच्यामागे पत्नी सुप्रसिद्ध संगीतनाट्य अभिनेत्री निर्मला गोगटे, दोन कन्या, जावई आणि नातवंडे तसेच मोठा चाहता वर्ग असा परिवार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading