मातंग समाजातील तरुणांची जातीय द्वेषातून हत्या झाल्याच्या निषेधार्थ बसपा राज्यभर आंदोलन करणार
पुणे : औरंगाबाद येथील मनोज उर्फ मनिष शेषराव आव्हाड या मातंग समाजातील तरुणांची जातीय द्वेषातून हत्येच्या निषेधार्थ बसपाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
मागील 20 एप्रिल रोजी औरंगाबाद येथील मनोज उर्फ मनिष शेषराव आव्हाड वय वर्ष 27 या तरुणाला जातीय द्वेषातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. सदर घटना मानवजातीला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून जातीय तेढ महाराष्ट्रातील समाजामध्ये वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. आरोपींनी सदर तरुणाला हात-पाय बांधून व सदर घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण करून समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला. मात्र तरी देखील या घटनेची महा विकास आघाडी सरकारने व विरोधी पक्षांनी या घटनेची दाखल घेतलेली नाही. अद्याप पिडीत कुटुंबाला शासनाच्या वतीने भेटही घेण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर संबंधित दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवण्यासाठी वरिष्ठ सरकारी वकील यांची नियुक्ती करून संबंधित गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, अशी मागणी पिडीत कुटूंबीयांकडून केली जात आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा व महाराष्ट्राच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल सदर घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन माननीय पुणे जिल्हाधिकारी यांना दिनांक आज देण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी हुलगे चलवादी महाराष्ट्र राज्याचे महासचिव सुदीप गायकवाड पुणे जिल्हा प्रभारी मेहमूद जकाते पुणे जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड पुणे जिल्हा प्रभारी संजय शेंडगे पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष निधी ताई वैद्य पुणे शहर प्रभारी गजेंद्र अल्लाट रमेश घोडके कैलास ओहाळ, इंदुरीकर सुहास कांबळे यावेळी उपस्थित होते
