अॅड. गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर; मराठा समाज आक्रमक जोरदार घोषणाबाजी
पुणे : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आज सदावर्तेंना या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी. त्यामुळे काहीकाळ ताणावाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या तुषार काकडे, अमर पवार, सचिन आडेकर, प्रसाद कोंडे, करण जगताप, गुरुनाथ चव्हाणयांना आदींना ताब्यात घेण्यात आले.
सदावर्ते यांनी एका वृत्त वाहिनीवर मुलाखत दिली हाेती. त्यावेळी सदावर्तेंनी मराठा समाजाचा अवमान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र काही दिवसांपुर्वी मराठा समाजातील नेत्यांनी सदावर्तेंच्या तक्रारीबाबत न्यायालयात अर्ज केला हाेता. त्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश दिल्याने भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याबाबत कार्यवाही केली. आज सदावर्तें आले भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये आले असता मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सतत मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असलेल्या ऍड.सदावर्ते यांची विकृती एस.टी. कामगारांच्या संपा वेळी अधोरेखित झालेलीच आहे असे तुषार काकडे म्हणाले. मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी धक्काबुक्की करत ढकलत पोलीस स्टेशन पासून दूर करण्याचा प्रयत्न केला. सदावर्ते व त्यांची पत्नी जबाब देऊन गेल्यानंतर तुषार काकडे, अमर पवार, सचिन आडेकर, प्रसाद कोंडे, करण जगताप, गुरुनाथ चव्हाणयांना ताब्यात घेण्यात आले.
