Pune : पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
पुणे: मनसेच्या वतीने पुण्यातील खालकर मारुती मंदिरात सकाळी 11 वाजता महाआरती करण्यात आली.पुणे पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह आठशे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.तरी महाआरती करण्यात आली.मोठ्या उत्साहात मनसे कडून महा आरती व हनुमान चालीसा पार पडली. त्यानंतर पोलीसानी मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात घेतले आहे.
अजय शिंदे त्या वेळी म्हणाले,राज ठाकरेंचा आदेश हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, असा पवित्रा आता मनसैनिकांनी दिला आहे. तर आता राज ठाकरेंनी पत्र लिहित परखड आणि आक्रमक पवित्राही स्पष्ट केला आहे.आम्ही राज साहेबांचा आदेश हा अंतिम पाळतो.जो पर्यंत राज ठाकरे हे आम्हाला माघारी होण्याचा आदेश देत नाही तो पर्यंत आम्ही महा आरती व हनुमान चालीसा म्हणनार असे अजय शिंदे म्हणाले.
