विषारी विळख्यातून संविधानाला सोडविण्याची आज आवश्यकता -सचिन सावंत
पुणे:महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला देशात सुरू असलेल्या द्वेषपूर्ण राजकारणाच्या विरोधात व सर्वधर्म सद्भावनाच्या समर्थनार्थ सभा महाविकास आघाडी , डावे- पुरोगामी पक्ष आयोजित आयोजित करण्यात आली.
या सभेमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, आज देशात सनातनी, मनुवाद फोफावला आहे आणि त्याविरोधात सामूहिक आवाज उठविण्याची सुरुवात महात्मा फुले यांच्या नंतर पुन्हा एकदा पुण्यातून सुरू झालेली आहे. भाजपला देशात समरसता हवी आहे समता नव्हे! त्याना समता का नकोय हे आपण समजून घ्यायची आज गरज आहे. म्हणून समरसतेच्या विषारी विळख्यातून संविधानाला सोडविण्याची आज आवश्यकता आहे.
या सद्भावना निर्धार सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.उल्हासदादा पवार हे होते. या सभेचे प्रास्ताविक पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
या सभेसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, मा.नगरसेवक व मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र संघटनेचे कार्याध्यक्ष .अविनाशभाऊ बागवे, आ.चेतन तुपे, आ.सुनील टिंगरे, बाळासाहेब शिवरकर, बी.जी.कोळसे पाटील, .अजित अभ्यंकर, .सुभाष वारे, प्रवीण गायकवाड, गोपाळदादा तिवारी, .दीपाली धुमाळ, .राजलक्ष्मी भोसले आदींसह महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.