मस्जिदीवर भोंगे लावु ही भुमिका योग्य नाही- रामदास आठवले

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या विधानानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे माजी मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शहर अध्यक्ष पदावरून राज ठाकरे यांनी हटवले . त्यावर मनसेत चांगलेच राजकारण तापले होते त्यावर मशिदीवर परंपरागत भोंगे लावले आहे म्हणून आम्ही देखील भोंगे लावू ही भूमिका योग्य नाही. विरोधाला विरोध करणे हे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता पत्रकारांना याबाबत प्रतिक्रिया दिली .

राज ठाकरे हे एका पक्षाचे नेते आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ते वारसदार नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहे. पण, उद्धव ठाकरे हे त्यांचे वारसदार असूनही ते आमच्या सोबत येत नाही याचे दुःख आहे, असा टोला आठवले यांनी राज ठाकरेना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर विचारले असता आठवले म्हणाले की, एस.टी कामगारांच्यावतीने पवार साहेबांच्या घरी जो काही हल्ला करण्यात आला आहे. तो अत्यंत निंदनीय आहे. एस.टी कामगारांच्या आंदोलनाला चिघळवण्याचा प्रयत्न होत आहे. असे वळण देणे योग्य नाही. पवार यांच्या घरावर जो काही हल्ला झाला आहे, त्याला उद्धव ठाकरे, हे सरकार जबाबदार आहे. सरकारने विलिनीकरण करण्याचा विचार करावा, तसेच जे आंदोलक आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण, सेवेत घेणार नाही हा निर्णय अयोग्य आहे.असे देखील आठवले म्हणाले.
काल दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात जे काही भांडणे झाली त्यावर आठवले यांना विचारले असता ते म्हणाले की, जेएनयू विद्यापीठात वेगवेगळ्या विचारधारेचे विद्यार्थी असतात. जी घटना काल झाली ती व्हायला नको होती. त्याची चौकशी झाली पाहिजे. भारत देश सर्वधर्मांचा देश आहे. सर्व भावनांचा आदर केला पाहिजे. अश्या पद्धतीने व्हेज नॉनव्हेजवरून वाद व्हायला नको, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

भाजपचे नेते सारखे बोलून दाखवतात की उद्धव ठाकरे यांनी अजून भाजप बरोबर यावे., त्यावर रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांना काँग्रेसबरोबर जाऊ दिले नसते. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर अजूनही विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विचार बदलावे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सोडावे आणि भाजपबरोबर एकत्र यावे, असे देखील यावेळी

Leave a Reply

%d bloggers like this: