Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पोट कमी करा, पोलीस हा जवाना सारखा स्मार्ट असला पाहिजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : गुन्हेगारांशी लढण्यासाठी पोलीस सशक्त, ताकदवान असणे आवश्यक आहे. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिले होते. आता काही पोलिसांची पोटं सुटली आहेत. ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करतील ? पोलिसांनो ही बाब विचारात घेत पोलिस भरतीमध्ये करताना उंची व वजनाचे काही निकष लावावेत. पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांचा दरारा वाटला पाहीजे. यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आपले पोट कमी करावे. आपल्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष द्यावे. पोलीस जवाना सारखा स्मार्ट असला पाहिजे असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिला.

महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाच्या  उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नवे नवे पर्याय शोधून काढत असतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस दलाचेही सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यात देखील पोलीस दलाला आवश्यक तो निधी देण्यात येईल. पोलिस स्थानकाच्या इमारतींची दुरुस्ती, नव्या आयुक्तालयाची कामे होत आहेत. पुढील काळात पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवण्यास राज्य शासनाचे प्राधान्य असून  त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.  सीएसआर फंडातून काही कंपन्या पोलीस दलाला  मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. दलाच्या सक्षमीकरणासाठी ती मदत घ्यायला काही हरकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितल.

पोलिस दलाला कोणताही डाग लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस दलाने इतर विभागांना सहकार्य करावे. या सहकार्यामुळे राज्य सरकारला उत्पन्न मिळेल आणि त्यातून पोलिस दलाला आणखी सुविधा पुरविण्यास निधी उपलब्ध करून देणे शक्य होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading