Monday, October 5, 2026
Latest NewsSports

S. Balan Trophy – पुनित बालन ग्रुप संघ, एमईएस इलेव्हन संघांचे सलग विजय !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि एमईएस इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत सलग विजयांची नोंद केली.

या स्पर्धेत सुजित उबाळे याच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर एमईएस इलेव्हन संघाने विझार्डस् इलेव्हन संघाचा ११० धावांनी धुव्वा उडवित सलग विजय नोंदविला. एमईएस इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात २०७ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये सुजित उबाळे याने नाबाद ९४ धावांची तर, हर्ष संघवी याने ६४ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना विझार्डस् इलेव्हन संघाचा डाव ९७ धावांवर आटोपला.

श्रीकांत मुंडे याच्या ७२ धावांच्या खेळीमुळे पुनित बालन ग्रुप संघाने एसके डॉमिनेटर्स इलेव्हन संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसके डॉमिनेटर्स इलेव्हन संघाने १२१ धावांचे आव्हान उभे केले. एसके डॉमिनेटर्स संघाचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. पुनित बालन संघाकडून अक्षय दरेकर (२-९), पुनित बालन (२-३०) आणि उमर शहा (२-१६) यांनी चमकदार गोलंदाजी केली. पुनित बालन ग्रुप संघाने हे आव्हान १४ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. श्रीकांत मुंडे (नाबाद ७२ धावा) आणि हृषीकेश मोटकर (४१ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः
१) एमईएस इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद २०७ धावा (सुजित उबाळे नाबाद ९४ (५०, ४ चौकार, ७ षटकार), हर्ष संघवी ६४ (४०, ४ चौकार, ३ षटकार), रत्नदीप लोंढे १-२४) वि.वि. विझार्डस् इलेव्हनः १६ षटकात ९ गडी बाद ९७ धावा (रत्नदीप लोंढे २९, आदित्य गजभिये २१, गौरव जोशी ३-२१); सामनावीरः सुजित उबाळे;

२) एसके डॉमिनेटर्स इलेव्हनः १९.५ षटकात १० गडी बाद १२१ धावा (राकेश मते २१, अक्षय पंचारीया १८, शिवम ठोंबरे १८, अक्षय दरेकर २-९, पुनित बालन २-३०, उमर शहा २-१६) पराभूत वि. पुनित बालन ग्रुपः १४ षटकात २ गडी बाद १२२ धावा (श्रीकांत मुंडे नाबाद ७२ (४४, ९ चौकार, ३ षटकार), हृषीकेश मोटकर ४१, महेश वाघिरे २-२४); सामनावीरः श्रीकांत मुंडे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading