सिंहगड रोडवरील अतिक्रमण कारवाई नियमबाह्य – हवेली तालुका कृती समीती

पुणे:महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई नियमबाह्य असुन त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व पक्षिय हवेली तालुका नागरि कुती समीतीने दिला आहे.
कुती समीतचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, धायरी वडगाव सिंहगडरोड भागासह शहरात कोणत्याही नोटिसा न देता दुकाने, व्यावसायावर धडक अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. सर्व मिळकतीचे कर नियमितपणे भरले जात आहेत. कोरोना काळात दोन वर्षे सर्व व्यावसाय ,दुकाने बंद होती. दोन महिन्यां पुर्वी महागाईला तोंड देत कसेबसे व्यावसाय ,दुकाने सुरू झाले आहेत. कर्जबाजारी होऊन व्यावसायिक जगत असताना लाखो रुपयांची मालमत्ता अतिक्रमणाच्या नावाने नष्ट केली जात आहे.

त्यामुळे भुमीपुत्रांसह दुकानदार.,व्यावसायायीक उध्वस्त होणार आहेत. नियमबाह्य कारवाई विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सिंहगड रोड परिसरात वडगाव पासून धायरी फाटा ,लगड मळ्या पर्यंत पालीकेच्या विविध विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या. दुकानांचे फलक, मांडण्या ,शेडवर धडक कारवाई करण्यात आली. पोलीस फौजफाटा, अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. कारवाई रोखण्यासाठी व्यापारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह दुकानदार, स्थानिक कार्यकर्ते विनवण्या करत होते. गुरुवारी ( ३१) रोजी अतिक्रमण बाबत धायरी येथे संबंधित विभागा बरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: