सारथी संस्थेच्या इमारतीचे भूमिपूजन करून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा खून करणाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करा… – संभाजी ब्रिगेड

पुणे : छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा महाराष्ट्रात सारखी संस्थेच्या निमित्ताने समाजाची प्रगती व्हावी हा सारथी संस्थेचा उद्देश होता व आहे. शाहू महाराज यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्या विरोधात आवाज उठवला. वेदोक्त प्रकरण महाराष्ट्राच्या पटलावर आहे. पुरोगामी विचारांची धार शाहूमहाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा दिसून येते. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून शाहू महाराजांचा आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहतो. त्यांच्या विचाराने सारथी संस्था चालावी हा शाहू महाराजांवर प्रेम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उद्देश आहे. मात्र सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी आज पुण्यात सारथी संस्थेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या वेळेस ‘विधिवत पूजा व कर्मकांड’ करून शाहू महाराजांच्या विचारांचा खून केला आहे… याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा खून केल्याबद्दल निंबाळकर आणि काकडे यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: