fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

युनिव्हर्सल चषक २०२२ फुटबॉल स्पर्धेत बटर सेवन संघ विजेता

पुणे  सागर केंडे व श्रीनाथ वीरकर आयोजित फुटबॉल युनिव्हर्सल चषक २०२२ स्पर्धा दिनांक १२ व १३ मार्च ला कर्वेनगर येथील ड्रिबल स्पोर्ट्स क्लब च्या फुटबॉल मैदानावर घेण्यात आल्या.

पुण्याच्या विविध भागातून एकूण १६ संघाने या स्पर्धेत भाग घेतला होता.प्रत्येक संघामध्ये सात खेळाडू व चार राखीव खेळाडू होते.स्पर्धा लीग व बाद पद्धतीने खेळविल्या गेल्या.

अंतिम सामना बघण्यासाठी फुटबॉल रसिकांनी गर्दी केली होती.रोमहर्षक झालेल्या सामन्यात बटर सेवन संघाच्या केविन घाडगे ,रणजित जोशी व हर्षद लुनावत यांनी गोल केले उपविजेत्या गेम ऑन संघाच्या ऋषीकेश बर्वे व अथर्व दहिभाते या खेळाडूंनी गोल केले. या सामन्यात बटर सेवन संघ विजेता ठरला.

प्रथम विजेत्या बटर सेवन संघाला रोख रुपये एकवीस हजार व चषक, तर उपविजेत्या गेम ऑन संघाला रोख रुपये अकरा हजार व चषक प्रमुख पाहुणे नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या हस्ते देण्यात आले.

अंतिम सामने पाहण्यासाठी व फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपचे सुशील मेंगडे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने,भाजपा कोथरूड चे अध्यक्ष पुनीत जोशी,शिवसेना कोथरूड समन्वयक सचिन थोरात,कांग्रेस कोथरूड अध्यक्ष विजय खळदकर,भाजपा युवा मोर्चाचे महेश पवळे,मनसे चे साईश शेवाळे,युवक राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड अध्यक्ष मोहित बराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वितेसाठी  विनीत ढोरे, अथर्व देशपांडे, स्पर्धा आयोजक सागर केंडे, श्रीनाथ वीरकर, रोहित चव्हाण,सचिन सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading