आकाश + बायजू’ज चे कोथरूड आणि बालेवाडी येथे नवीन केंद्रे सुरू

पुणे : हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्यासाठी त्यांचे नेटवर्क देशाच्या विविध भागांमध्ये विस्तारण्याचे ब्रीदवाक्य पुढे नेण्यासाठी, चाचणी तयारी सेवांमध्ये देशात अग्रेसर असलेल्या आकाश + बायजू’ज ने आज पुण्यात दोन नवीन क्लासरूम केंद्राचे उद्घाटन केले. एक कोथरूड आणि दुसरी बालेवाडीत. कोथरूड केंद्रात 1200 विद्यार्थ्यांसाठी 12 वर्गखोल्या असतील, तर बालेवाडी केंद्रात 8 वर्गखोल्या असतील ज्यात 900 विद्यार्थी बसू शकतील.
कोथरूड केंद्र 12/13/14 तिसरा मजला, रिव्होल्यूशन मॉल, सिटी प्राईड मल्टिप्लेक्स जवळ आहे तर बालेवाडी केंद्र एलिट प्रीमिओ, 101-102, पहिला मजला, दसरा चौक येथे आहे. क्लासरूम केंद्रे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन-स्तरीय अभ्यासक्रमांसह त्यांची गरज पूर्ण करेल आणि मूलभूत गोष्टी मजबूत करण्याव्यतिरिक्त त्यांना विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यास मदत करेल उदा. ऑलिंपियाड इ..
दोन नवीन क्लासरूम केंद्राचे उद्घाटन अमित सिंग राठौर,, प्रादेशिक संचालक आकाश + बायजू’ज आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

नवीन केंद्राच्या उद्घाटनाविषयी बोलताना आकाश चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, आकाश + बायजू’ज म्हणाले: “कोथरूड आणि बालेवाडी येथे पुण्यातील 3 रे आणि चौथे क्लासरूम केंद्रे ऑलिम्पियाड्स पास करून आणि डॉक्टर ,आयआयटीयन बनण्याची तयारी करणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी मोठे वरदान ठरेल. आज, आकाश + बायजू’ज त्याच्या केंद्रांच्या पॅन-इंडिया नेटवर्कद्वारे देशभरात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आमच्या शैक्षणिक सामग्रीची गुणवत्ता आणि आमच्या शिकवण्याच्या पद्धतींची परिणामकारकता, विद्यार्थ्यांच्या निवडींच्या संख्येवरून दिसून येते, पदवीपूर्व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकाशला सर्वोच्च पर्यायांपैकी एक बनवते.”


चौधरी पुढे म्हणाले “कोथरूड आणि बालेवाडी येथे आमची क्लासरूम केंद्रे उघडताना आणि पुण्यात तसेच महाराष्ट्रामध्ये आमचा ठसा वाढवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. “आमच्या राष्ट्रीय नेटवर्कमध्ये या शाखेचा समावेश करणे, तंत्रज्ञान-सक्षम प्रणाली वापरून, प्रमाणित दर्जेदार अध्यापन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवते.”
आकाश + बायजू’ज’मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी एकतर झटपट प्रवेश सह शिष्यवृत्ती परीक्षा (iACST) देऊ शकतात किंवा एएनटीएचइ (ANTHE) (आकाश नेशनल टैलेंट एक्झाम) साठी नोंदणी करू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: