ऊर्जा क्षेत्रात देशाने स्वयंपूर्ण व्हावे – डॉ. प्रमोद चौधरी

पुणे : ऊर्जा क्षेत्रात देशाने स्वयंपूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी बायोइथेनॉल सारख्या पर्यायी ऊर्जा उत्पादनांत काम करण्याची आवश्यकता प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणार्या चौधरी यांना विल्यम सी. होलमबर्ग यांच्या नावाने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील या वर्षीच्या बायोएनर्जी क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला. त्या निमित्त महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात चौधरी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

%d bloggers like this: