fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

सुंदर हस्ताक्षरामुळे समजते मनाचे अंतरंग – व्यंगचित्रकार चारुहास पंडित

पुणे : शालेय वयात केलेले सुलेखन संस्कार हे आयुष्यभर टिकतात. या कलेमुळे योग्य वयात मुलांना नीटनेटकेपणाची सवय लागते. सुंदर हस्ताक्षरामुळे मनाचे अंतरंग जाणले जाते, असे मत व्यंगचित्रकार चारूहास पंडित यांनी व्यक्त केले.

अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल आशिष प्लाझाच्या सभागृहात पार पडला. यावेळी अक्षर रसिक सुलेखन वर्गाचे शैलेश जोशी व व्हिनस टेÑडर्सचे सुरेंद्र करमचंदांनी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील २५ शाळांमधून इयत्ता ३री ते ८वी पर्यंतच्या तब्बल १५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्याबद्दल शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

रमणबाग प्रशालेतील कार्तिक थोरवे, पुष्कर जाधव, आर्य विद्या मंदिरमधील दर्शाली गायकवाड, शिवांजली देशमुख, हुजूरपागा प्रशालेतील हर्षदा फाळके, स्वरा घोलप, त्राक्षी तेली, एन.ई.एम.एस. मधील स्वरा चौधरी, तन्वी दिघे, रणवीर ठाकूर, गरवारे प्रशालेतील मंजिरी राऊत, सुंदर गव्हाणे, आपटे प्रशालेतील स्नेहल जुंदारे, कस्तुरी यादव, मा.स.गोळवलकर गुरुजी माध्यमिक शाळेतील मंजिरी जाधव, नू.म.वि. मुलींच्या शाळेतील श्रेया भुजबळ, संस्कृती चव्हाण, वैद्य प्रा.शाळेतील जिया धुमाळ, डी.ई.एस.प्रायमरीमधील अक्षरा जोशी, शर्वरी म्हसकर, हुजूरपागा प्राथमिक शाळेतील प्रतिक्षा सन्नके, नवीन मराठी शाळेतील अक्षया तांदळे, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता येतेहेल गौरव कसबे, शार्दुल महाजन यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.

याशिवाय हुजूरपागा प्रशालेतील आकांक्षा वरे, रेवा निकम, फुले प्रशालेतील रचना पांगले, राठी प्रशालेतील दुर्वा चंदनशिवे, अक्षरा जाधव, गोळवलकर प्रा. शाळेतील अनुश्री वेंगुर्लेकर, भार्गवी एकबोटे, रेणुका स्वरुपमधील मिहिका महाडिक, खादिजा सत्तार, महेश विद्यालय मराठी मधील आराध्य कंधारे, ॠतुजा मोरे, योगेश म्हस्के, महेश विद्यालय इंग्रजीमधील पियुश पवार, प्राप्ती सेन, तन्वी काटकर, डी.ई.एस. माध्यमिक मधील ज्ञानदा कुलकर्णी, वेद कडेकर, ग.रा.पालकर प्रशालेतील ज्ञानेश्वर निकम, प्राची शिंदे, अहिल्यादेवी प्रशालेतील यज्ञा तांबट, कार्तिकी तापकीर, कन्या शाळेतील काशीबाई हिरेबैनूर, संस्कृती मनोहरे आणि एस.एस.पी.एम.डे स्कूलमधील दिव्यांका देवकुळे, अक्षरा नलावडे हे आपापल्या गटात अव्वल होते. स्पर्धेत १६ मराठी माध्यमाच्या शाळा तर ९ इंग्लिश माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या. गेली ४७ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात नाव मिळवलेले व्हीनस ट्रेडर्स आणि २५ वर्षांपासून सुलेखन क्षेत्रात अलौकिकपणे नाव मिळवलेले अक्षर रसिक सुलेखन वर्ग हे मराठी लेखन वृद्धीच्या दृष्टीने स्पर्धेद्वारे प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading