fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

१०० नगरसेवक असलेल्या पक्षात ‘स्थायी अध्यक्ष’पदा साठी इतर कोणीच् पात्र कसे नाही.. ?
काँग्रेस राज्य प्रवक्ते, गोपाळदादा तिवारी

पुणे : महापालिकेत १०० हून अघिक नगरसेवक असलेल्या भाजप मध्ये एका व्यक्तीस ४ वेळा सतत स्थायी समिती अध्यक्ष पदाची संधी मिळते हे कोणत्या “पात्रतेचे निष्कर्ष” हे तरी भाजपने जाहीर करावे..असे परखड मत काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे..

पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी सलग ४थ्यांदा कसबा मतदार संघातील प्रभाग १५ चे नगरसेवक हेमंत रासने यांची नियुक्ती भाजपने केली आहे. याच प्रभाग १५ व कसबा’ मतदार संघातील मुक्ता टिळक यांची देखील २०१७ नंतर  अडीच वर्षे महापौर पदी निवड झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.. परंतू महापौर व सलग स्थायी समिती अध्यक्ष पद सलग एकाच टर्म मध्ये मोठा कालावधी मिळून देखील कसबा मतदार संधाचा विकास झाल्याचे मात्र कोठेही निदर्शनास येत नाही तसेच “शहराच्या सर्वांगीण विकासाचे” भाजपचे धोरण नसल्याचेच यातून स्पष्ट होते अशी पुस्ती ही त्यांनी जोडली..!

“काँग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक आजी – माजींना घेऊन, छिना छिपटी व ऊधारी ऊसनवारी” करून “बहूमत मिळालेल्या” भाजप नेत्यांकडून प्रत्यक्ष मात्र विकास कामाची संधी किती नगरसेवकांना दिली गेली (?) याचे आत्मचिंतन करण्याची वेळ या नगरसेवकांवर येऊन ठेपली आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही…!
स्थायी समिती व तिचे अध्यक्षपद हे विकास कामे करण्यासाठी विविध मतदार संघात दिले जाते.. ही प्रथा वा संकेत आहेत.. मात्र “एकच् व्यक्ती” सोडून भाजप नेत्यांचा “शहरातील इतर भाग व इतर मतदार संघा”प्रती सवतासुभा व सापत्न भाव असल्याचेच स्पष्ट होते.. असे ही गोपाळदादा तिवारी यांनी स्पष्ट करून सत्तेची मक्तेदारीचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांचा इतर अनेक पात्र नगरसेवकांवर दुर्लक्षीत कण्याचे व त्यांना फक्त वापरून घेण्याचे संकुचित मनसुबेच यातून स्पष्ट होतात.. सुज्ञ पुणेकरांनी यातून बोध घ्यावा व मनपा निवडणूकीत मतदान करावे असेही गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे…!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading