Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कोर्टात जाण्याआधी पहिले चर्चेला तर या अजित पवार यांचा पुणेकरांना टोमणा

पुणे: नागरिकांवर तळजाईवर रूपया पार्किंग चार्ज लावतात आणि पुणेकर ओरडतात, काही पठ्ठेतर थेट कोर्टातच जातात.पुणेकरांचा स्वभाव आपल्याला सर्वांना माहिती आहे. अरे कोर्टात जाण्याआधी पहिले चर्चेला तर या सरकारी चर्चेतून मार्ग काढता येतो असं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तळजाई येथील विकास कामांचा शुभारंभच्या कार्यक्रमाच्या वेळी पुणेकरांना  टोमणा लगावला.

अजित पवार म्हणाले, कुत्र्यांचे लाड घरी करा, हवं तर गादीवर झोपवा तळजाई टेकडीवर होणाऱ्या घाणीच्या साम्राज्यावरुन अजित पवारांनी पुणेकरांना चिमटा काढला आहे. अजित पवार म्हणाले, पुणेकरांनी तळजाईवर पाळीव कुत्री आणू नयेत. कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा, हवं तर गादीवर झोपवा… पण इथं तळजाईवर नको असं म्हणत अजित पवारांनी तळजाईवर मॉर्निंग वॉकला येताना कुत्रे घेऊन येणाऱ्या पुणेकरांना टोमणा मारला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, मी तळजाईकडे येताना बघितलं लोक रस्त्यावरच कचरा टाकतात हे बरं नाही. भटकी कुत्री तळजाईवर येतात.इथलं फुलपाखरू उद्यान बहरलं पाहिजे. तळजाईमुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळतोय.म्हणजे हे वनउद्यान टिकलं पाहिजे. वाचा  सगळंच तुम्हाला हवं.मग आम्ही धुणी-भांडी करायची का?’ मुख्यमंत्री संतापले सकाळी उठावे लागते म्हणून कुरबूर नको अधिकाऱ्यांना पुणे पोस्टिंग पाहिजे असेल तर सकाळी उठायलाच पाहिजे, कारण मी सकाळीच कामाला सुरूवात करतो, हे अधिकाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवावं. अजित पवारांमुळे अधिकाऱ्यांना पण सकाळी उठावं लागतं.
अशी कुरबूर नको. मी आज ठरवून तळजाईवर आलो, मला इथली कामं बघायची होती, लोकांनाही भेटलो समस्या जाणून घेतल्या असंही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading