Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राज ठाकरे याचं मिशन पुणे महानगरपालिका

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या आहेत. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे दौऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज ठाकरे मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. तर, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading