नवाब मलिक यांच्यासाठी महाविकास आघाडी एकटवली
पुणे: केंद्रातील भाजप सरकार गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीला काहींना काही गोष्टींवरून बदनांम करण्याचा प्रकार करत आहे.त्यात राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याच्यावर भाजपने ईडीचा वापर करून त्यांना अटक केली. राज्यभर नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध होत आहे.या विरोधात आज पुण्यातील महाविकास आघाडी मधल्या घटक पक्षांनी आज आंदोलन आले.
या आंदोलनाच्या वेळी केंद्रातील भाजप सरकार ने ईडीचा वापर करून नवाब मलिक यांना अटक केली निषेध करण्यात आला.
या आंदोलनाला काँग्रेसच्या संगीता तिवारी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, नगरसेवक अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, , शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे व महाविकास आघाडी मधला घटक पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश बागवे म्हणाले, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची काही चूक नसताना त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. जुना एकदम गुन्हा काढून भाजपने त्यांच्यावर कारवाई केली. आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. आज म्हणून मायेचा सागर मधील घटक पक्ष एकत्र येऊन या घटनेचा निषेध करत आहोत. असे रमेश बागवे म्हणाले.
संजय मोरे म्हणाले, या भाजप सरकारने गेल्या दोन-तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना एवढा त्रास दिला आहे. केंद्रीय यंत्रणा या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे. भाजपने ईडीचा
वापर करून नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली व त्यांना अटक केली आहे. जोपर्यंत नवाब मलिक यांची सुटका होत नाही. तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार याचा निषेध करणार .असे संजय मोरे म्हणाले.
