नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या वर काल ईडीने कारवाई केली.व त्याना अटक केली.त्याना 3 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आज पुण्यात भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन पुणे महापालिकेच्या जवळ करण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी नवाब मलिक यांनी कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी भाजपतर्फे मागणी करण्यात आली. हे आंदोलन भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या आंदोलनाला भाजपचे शहर संघचिटनीस राजेश पांडे,सुनील माने, राजेश येणपुरे, गणेश घोष शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश मुळीक म्हणाले,कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली आहे. देशद्रोही दाऊद इब्राहिम यांच्याशी नबाब मलिक यांचा संबंध आहे हे स्पष्ट झाले आहे. हे कदापि भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत. त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर येथील पुढील काळात भाजपचे आंदोलन राज्यभर चालूच राहील असा इशारा जगदीश मुळीक यांनी दिला.
