Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

आम्ही ५९ vs ५ वर्ष असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणार – चंद्रकांत पाटील

पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत  पाटील यांनी  मनपा आयुक्त विक्रमकुमार यांची विविध विषयांवर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज मी महानगरपालिकेच्या प्रलंबित विषयांसाठी पालिका आयुक्तांची भेट घेतली . राष्ट्रवादी काँग्रेस भाजप वर पालिकेतल्या विविध प्रश्नांना धरून सारखे टीका करत असतात . त्या वरात त्यांना टीका करणायचे मुद्देच नाहीत त्यामुळे ते काही बोलत असतात.येत्या पुढील काळात महापौर त्यांना उत्तर देतील.आम्ही ५९ vs ५ वर्ष असे प्रश्न आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणार आहोत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ,पुणे शहर भाजपचे प्रवक्ते संदीप खेडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सुनीता वाडेकर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले,आम्ही महापालिका आयुक्त यांच्याबरोबर विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. गुंठेवारी हा विषय भरपूर दिवसांपासून प्रलंबित होता.गुंठेवारी हा सध्या चिंतेचा विषय आहे.हा कर गरिबांना परवडत नाही.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याचा कायदा देखील तयार केला होता.
गुंठेवारी विषयासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी बोलणार . असल्याचे त्यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या शी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.शिक्षण मंडळाची भरती हा देखील मुख्य प्रश्न आहे.जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी ही भरती केली जाईल.शिपाई भरतीची फाईल देखील मंत्रालयात गेली आहे.शिक्षण मंडळाची सावयत्ता यावर देखील चर्चा झाली.पोषण आहार देखील १५ मार्च पासून सुरू होईल. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
नदी सुधार होर्डिंग, होल्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे यांनी परवा ट्विट करून भाजप वर टीका केली होती .त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही नदी सुधार झाला अस दाखवलं नाही.सुप्रिया सुळेंनी आधी बॅनर वाचावं आणि टीका करावी. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading