Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

नवाब मलिक यांनी कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटील

पुणे : आज ‘ईडी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या वर कारवाई केली. चौकशी केल्यावर त्यांना आता ईडीने सोडले आहे. पण आता नवाब मलिक यांना कॅबिनेट मंत्री म्हणून राहण्याचा कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकर नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

या सरकारने घटना पायदळी तुडवली

मुंबई आयुक्त परमवीर सिंग व अनिल देशमुख यांच्यावर पण ईडीने कारवाई केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, यादी मोठी आहे मला दम लागला. या सरकारने घटना पायदळी तुडवली याची 22 पानी नोट तयार आहे. उशिरा गेलो तर चांगली कोठडी मिळणार नाही म्हणून जणू काही रांग लागलीय. पुढचा माझा लावा यासाठी धावपळ चाललीय, कारण उशिरा गेलो तर कोठडी चांगली मिळणार नाही, अशी खोचक टीका ही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading