Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी काँग्रेस परिसर संवाद यात्रा 24 आणि 25 फेब्रुवारीला पुण्यात; जेष्ठ नेते थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा असंख्य कार्यक्रत्याचा परिवार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी परिवारातील सर्व  सदस्यांसोबत संवाद साधण्यासाठी ‘संवाद कार्यकर्त्यांचे पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या संकल्पनेसह येत्या 24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारीला पुण्यात  राष्ट्रवादी काँग्रेस परिसर संवाद यात्रा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, या अंतर्गत सर्व प्रमोटरचे अध्यक्ष कार्यकर्त्यांची जयंत पाटील संवाद साधणार असून ज्येष्ठ नेत्यां सोबत थेट संवाद होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता कृष्ण सुंदर लॉन्स डीपी रोड, शुक्रवारी (दि. 25) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता शहर कार्यकारिणी व उर्वरित चार विधानसभा मतदार संघाचा आढावा बाबत महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे सर्व नेते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संघाचा आढावा गुरुवारी (दि.24) दुपारी 3 ते 4 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक कृष्णसुंदर गार्डन म्हात्रे पूल डीपी रोड, दुपारी 4 ते 5 कोथरूड विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ कृष्णसुंदर गार्डन म्हात्रे पूल डीपी रोड , सायंकाळी 5 ते 6 खडकवासला विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ कृष्ण सुंदर गार्डन म्हात्रे पूल डीपी रोड , सायंकाळी सहा ते सात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ कृष्णसुंदर गार्डन म्हात्रे पूल डीपी रोड.

अजित पवार यांच्या उपस्थितीत मतदार संघाचा आढावा

शुक्रवारी (दि. 25)  दुपारी 1 ते 2.30 पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारिणी बैठक स्थळ – महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी , दुपारी 3.30 ते 5 वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ – महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी , सायंकाळी 5 ते 6.30 हडपसर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ- महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, सायंकाळी 6.30 ते 7.30 पर्वती विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ – महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी,7.30 ते 8.30 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक स्थळ – महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading