Friday, June 5, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

दोरांडा चारा घोटाळा प्रकरण : लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा कारावास

झारखंड : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच 60 लाखांचाही दंड ही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनीलालू प्रसाद यादव यांच्यासह 41 जणांना दोषी ठरवले होते. आज यापैकी 38 जणांना शिक्षा होणार आहे. अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्या 38 जणांना आज शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी 35 जण बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. तर लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले  आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading