Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीत जिंकणार – यशोमती ठाकूर

पुणे: महिलांना भाजप सरकारने सुरक्षा नाही. या सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार हे होत गेले. याचा फटका येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपला बसेल .व काँग्रेस पक्ष हा महापालिका निवडणुकीत जिंकून येईल. असे मत काँग्रेसचे नेत्या व महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे लडकी हुं लड सकती हुं”या कार्यक्रम एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुण्यात गुडलक चौक येथे करण्यात आला. पोलिसांनी काँग्रेसच्या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे काँग्रेसच्या महिलांनी गुडलक चौकात लडकी हू लढ सकक्ती हू कार्यक्रम घेतला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमच्या महा विकास आघाडी सरकारने राज्यात महिलांवरील अत्याचार हे कसे थांबवावे.व महिलांना प्रत्येक उद्योग-धंद्यात व अन्य क्षेत्रात पुढे कसे जाता येईल यासाठी भरपूर प्रयत्न केले असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
या कार्यक्रमाला पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, संगीता तिवारी, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे शहर महिला कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षा सोनाली मारणे,पुणे शहर काँग्रेस महिला शहराध्यक्षा, सुजाता शेट्टी, शोभना परळीकर, नंदाताई डावरे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, अंजली सोलापुरे, नीता टाळु, ताई कसबे, मंगला चव्हाण, शोभा पाडेकर, बेबीताई राऊत, माया डोरे, सुनिता मेमुर, रमा भोसले, वंदना सातपुते, अजली पंखा वाला, अंजली सोलापुरे, रेश्मा राणे , शाळेतील व कॉलेजमधील मुली , पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या पुणे शहरातील महिला पदाधिकारी व कार्यकत्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading