fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसदरत्न पुरस्कार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी जाहीर


पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याही वर्षी जाहीर झाला आहे. खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार सुळे यांनी सलग सातव्या वर्षी पटकावला असून गेल्या वर्षी त्यांना याच संस्थेने त्यांना संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. गेल्या बारा वर्षांपासून संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू १७व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading