Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

हिंदू महासंघ तर्फे शिवजयंतीनिमित्त दुचाकी रॅली

पुणे: आज शिवजयंती निमित्त राज्यात नागरिक विविध कार्यक्रम साजरे करत आहे. पुण्यात हिंदू महासंघाने कसबा गणपती ते कोथरूड येथील शिवाजी महाराज पुतळा पर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध पोशाख घालून तरुण-तरुणी व व पुणे शहरातील लोक उपस्थित होते.

या रॅलीचे नेतृत्व हिंदू महासंघ चे अ ध्यक्ष आनंद दवे यांनी केले. आनंद दवे म्हणाले, आज शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त हिंदू महासंघा तर्फे आम्ही कसबा गणपती ते शिवाजी महाराज पुतळा पर्यंत भव्य दुचाकी रॅली काढत आहोत. कोथरूड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आम्ही हार अर्पण करणार आहोत. आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम असेच चालू ठेवणार आहोत. दरवर्षी जास्तीत जास्त लोकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे मी आवाहन करत आहे. असे आनंद दवे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading