Monday, June 22, 2026
Latest NewsSports

‘स्पोर्ट्सफिल्ड करंडक’ – मास्टर्स क्रिकेट क्लब, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

पुणे : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘स्पोर्ट्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मास्टर्स क्रिकेट क्लब आणि जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात वेदांत गोरे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मास्टर्स क्रिकेट क्लब संघाने लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा ९७ धावांनी पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मास्टर्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२ षटकामध्ये ५ गडी गमावून १९४ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये ओम ढोबळे याने नाबाद ५३ धावांची तर, निशांत शिंदे याने ४७ धावांची खेळी केली व संघाला १९० धावांचा टप्पा पार करून दिला.

या आव्हानाला उत्तर देताना लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा डाव २०.१ षटकामध्ये ९७ धावांवर आटोपला. मास्टर्स संघाच्या वेदांत गोरे याने दुसर्‍या षटकापासून आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवायला सुरूवात केली. वेदांत याने २५ धावात ५ गडी बाद करून लिजंड्स संघाची निम्मी फलंदाजी तंबुत पाठवली. लिजंड्सकडून आर्यन मनोज (२५ धावा) आणि कुलदीप के. (१६ धावा) यांनी थोडा प्रतिकार केला.

जस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने सलग चार विजयांसह आणि ८ गुणांसह स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मास्टर्स संघाने २ विजय आणि ४ गुण तसेच सरस धावगतीच्या आधारे अंतिम फेरी गाठली. या दोन संघांमध्ये ५०-५० षटकांचा अंतिम सामना रंगणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
मास्टर्स क्रिकेट क्लबः २२ षटकात ५ गडी बाद १९४ धावा (ओम ढोबळे नाबाद ५३ (२२, ८ चौकार, २ षटकार), निशांत शिंदे ४७ (२७, ३ चौकार, ४ षटकार), सात्विक गुप्ता २९, श्रेयस कोद्रे १-२१) वि.वि. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः २०.१ षटकात १० गडी बाद ९७ धावा (आर्यन मनोज २५, कुलदीप के. १६, वेदांत गोरे ५-२५, हर्ष भोईटे ३-९); सामनावीरः वेदांत गोरे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading