धनंजय दामले सॉफ्टटेनिस सब-ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
पुणे : पुणे सॉफ्टटेनिस टेनिस संघटनेच्यावतीने कै. धनंजय दामले सॉफ्टटेनिस सब-ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवारी, १९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र मंडळ टेनिस मैदान येथे होणार आहे.
स्पर्धेमध्ये १५ वर्षाखालील मुले आणि मुली सहभागी होऊ शकणार आहेत. विजेत्या खेळाडूंना मेडल्स् आणि पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या एकदिवसीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धा स्थळी सकाळी ९ वाजल्यापासून नोंदणी होणार असून त्यानंतर स्पर्धा सुरू होणार आहे.
मुले आणि मुलांच्या गटातील विजेत्या पहिल्या आठ खेळाडूंना सब जूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये निवडले जाणार आहे. ही स्पर्धा सांगली येथे 24 ते 27 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रशांत रणदिवे (९८९०४४१५५५) आणि हर्षल मोघे (९४२२५६५६४७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
