शिवाजी महाराजांची शिवजयंती रोज साजरी झाली तरी हरकत नाही – छगन भुजबळ
पुणे : 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विविध संस्थांकडून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, शिवाजी महाराजांची जयंती रोज साजरी झाली तरी माझी हरकत नाही.
आज पुणे विद्यापीठाच्या आवारातील सावित्रीबाई फुले पुतळ्याचे अनावरण करण्या आले. यावेळी छगन भुजबळयांनी छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला.
…असे वाद शिक्षण संस्थांमध्ये नको
कर्नाटकात मागच्या आठवड्यात मुस्लिम समाजाच्या मुलीवर कर्नाटक सरकारने हिजाब घालायला बंदी घातली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रातली उमटले होते. त्यावर सगळ्यांनी शांततेने एकत्र राहिले पाहिजे, कर्नाटकात जे झालं ते सगळीकडे पसरतय. ते व्हायला नको. शिक्षणाचा फायदा समाजाला एकत्र करण्याचं काम करायला पाहिजे त्यामुळे अशा लढाया, वाद शिक्षण संस्थामध्ये नको. हे करणारे राजकारणी असतात. विद्यार्थ्यांमध्ये या भावना नको, असे छगन भुजबळ म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी कोणाशी ही बोलायला तयार
महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तरी ओबीसी समाजाला अजून काही आरक्षण भेटले नाही. ओबीसी समाजाला आरक्षण भेटणार का? याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले,आमचे मतभेद आहेत, इंपेरिकल डेटा मिळाला पाहिजे याची सुरुवात त्यांनीच केली, ज्या ज्यागोष्टींची गरज लागली त्या त्या वेळेला देवेंद्र फडणवीसांशी आम्ही बोललो. ओबीसी आरक्षणा संदर्भात ज्या ज्या लोकांशी बोलायची गरज असेल, त्यांच्याशी मी बोलणार, असे छगन भुजबळ म्हणाले एक एक ओबीसी शोधण्याचं काम सध्या आयोगाने सुरू केलं आहे, त्यामुळे आता त्या संदर्भात काम सुरू आहे, असे छगन भुजबळ म्हणाले
