Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांची मोठी घोषणा 

येत्या 26 फेब्रुवारीपासून करणार आमरण उपोषण

कोल्हापूर : मराठा समाज सुद्धा बहुजन समाजाचा घटक आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. म्हणूनच मराठा आरक्षणासाठी येत्या 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याची मोठी घोषणा आज छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषणास  बसणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणसाठी 5 मुद्दे मान्य केले पाहिजे. मराठा आरक्षणामध्ये आंदोलन करणारे लोकावरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली यावेळी केली आहे.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, 2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे; म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. गेल्या काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. मात्र अजूनही कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो मात्र आता मी उद्विग्न झालो, आशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. आरक्षण रद्द वर चर्चा केली. माझा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. पूर्णविचार याचिका मध्ये सरकारने वेळकाढूपणा केला आहे. जो पर्यंत सामाजिक मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत मराठाला आरक्षण मिळणार नाही. 8 महिन्यांपासून सरकार समिती स्थापन वर काहीही बोलत नाही, असे संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading