राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नितीन वसंत जाधव यांची नियुक्ती
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी नितीन वसंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाधव यांना नियुक्तीचे पत्र दिले. यापूर्वी जाधव यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विविध पदांवर यशस्वी काम केले आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहू असे नितीन जाधव यांनी म्हटले आहे
पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरात आणि महाराष्ट्रात वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून करून राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही नितीन जाधव यांनी सांगीतले.
