Sunday, November 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘आपुनकी बस्ती गटर मे है पर तुम्हारे दिल मे गंद है…’; नागराजच्या ‘झुंड’च पहिल गाणं रिलीज

‘खाने को पीने को साबूनसे धोनेको बिनधास्त आया है झुंड है …’ ‘आपुनकी बस्ती गटर मे है पर तुम्हारे दिल मे गंद है…’  अशी भन्नाट शब्दरचना असलेले  सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. रसिकांनी या गाण्याला पसंती दर्शविली असून अवघ्या काही तासात या गाण्याने 1 मिलियन view चा टप्पा ओलांडला आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बॉलीवूड शाहेनशह अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘झुंड’ हा हिंदी  चित्रपट येत्या 4 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील पहिल गाणं ‘आया ये झुंड है ..’  आज प्रदर्शित झालं आहे. मराठमोळी संगीतकार जोडी  अजय-अतुल यांनी हे गाणे संगीतबद्ध करण्याबरोबरच लिहिले सुद्धा आहे तर अतुल गोगावले यांनी गायलं आहे.

या गाण्यात अमिताभ यांच्यासोबतच अनेक नवीन चेहरे दिसत आहेत.  ‘सैराट’ मधला परश्या अर्थात आकाश ठोसर आणि ‘फॅड्री’ फेम सोमनाथ अवघडे सुद्धा पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करत असल्याचे दिसते.

‘झुंड’ हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल टीम तयार केली होती. याच कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे.

Leave a Reply