महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत अद्याप निर्णय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे: आगामी महापालिका आघाडी बाबत चर्चा झाली नाही. मात्र हरकती सूचना येईपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे स्वबळावर लढायचं नाही हे राज्यस्तरावर निर्णय होईल,स्थानिक कार्यकर्ते म्हणत असले तरी अजून त्याबाबत निर्णय नाही. असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.
मास्क इथून पुढे वापराचा नाही. अशा काही चर्चा राज्यात सुरू आहे त्यावर अजित पवार म्हणाले,
जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत मास्क वापरावच लागेल.कोरोना संपला तरी मास्क लावावा लागेल. किरीट सोमय्या आणि पुणे महानगरपालिकेतून काल येऊन पुणे शहराचे पोलीस आयुक्त हे ठाकरे- पवार सरकारचे एजंट आहेत याची मला खात्री आहे असा आरोप केला. त्यावर अजित पवार यांनी नो कमेंट्स असे उत्तर दिले.
राज्यात शिवजयंती साजरी करावी यासाठी विविध संस्था परवानगी मागत आहेत .पण मुख्यमंत्री यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते उपस्थित राहणार की नाही .याबाबत अजूनही शंका आहे. त्यावर अजित पवार म्हणाले शिवजयंती कार्यक्रमाला शिवनेरी ला मुख्यमंत्री उपस्थितीत राहणार नाहीत,त्यांना प्रवास सांगितला नाही. असेही पवार म्हणाले.
मागच्या आठवड्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली त्याने उदयनराजेची घर वासपसी होणार. का अशा चर्चा चालू झाल्या त्यावर अजित पवार म्हणाले, उदयनराजे पक्षप्रवेशासाठी नाही सातारा शहर हद्द वाढ झाली आहे काही विकास कामे होती त्याबद्दल चर्चा झाली.
काल मुंबई अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी वरळीतील एका भागाचा एकत्र येऊन पाहनी केली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले, त्यावर अजित पवार म्हणाले,आदित्य ठाकरे यांनी चांगले काम केलंय अजित पवार यांनी केलं कौतुक,त्यांनी काम चांगली केली आहेत.
पुणे महानगरपालिका प्रभाग रचना ही जाहीर झाली या प्रभाग रचनेच्या हरकती मध्ये अडचणी असतील. त्यांना पंधरा तारखेपर्यंत वेळ दिला आहे. त्यावर अजित पवार म्हणाले,प्रभाग पध्दतीमध्ये कोणाला आक्षेप असतील तर हकरती सूचना द्यावे,पुण्यात काहीही चर्चा होतात,भाजप राष्ट्रवादी यांना सोयीस्कर अस काही केलं नाही.
वाईन निर्णयाबाबत हरकती मागवल्या आहेत,अण्णा उपोषण आम्ही चर्चा करणार आहोत,त्यात पवार साहेबांनी आपलं मत मांडले आहे. तर ईडी ज्या कारवाई करत आहेत त्यावर अजित पवार म्हटले नो कॉमेंट.
