दिलासादायक : पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या हजारा पेक्षा कमी
आज दिवसभरात पुणे शहरात 868 नवीन कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्ण सँख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 868 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2141 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 55 हजार 296 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 36 हजार 984 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 7 पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9324 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या
8988 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 209 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6821 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
