बसपाच्या वतीने महामाता रमाई आंबेडकर यांच्या वाडिया महाविद्यालय समोरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण
पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा, पुणे शहराच्या वतीने महामाता रमाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त वाडिया महाविद्यालय समोरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या हस्ते रमाई आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बसपाचे मिलींद भोसले, सागर जगताप, ॲड अतुल सोनवणे, अविनाश जगताप, सागर खंडे, रामलिंग सोनवणे, सुधीर कांबळे, मिलिंद खंदारे, लिना गेडाम, अरविंद लोंढे, महमंदभाई, अँड कोठाळे व इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महामाता रमाई च्या त्यागामुळे आज सर्व समाजाला न्याय, हक्क व अधिकार मिळू शकले आहे. तसेच जगातील अजोड असे भारतीय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर भारताला देऊ शकले, हे विसरून चालणार नाही, असे मत या प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी मांडले.
