Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारांसाठी महाराष्ट्रातला काॅग्रेसचा एकही नेता उपस्थित असू नये? – विश्वंभर चौधरी

पुणे : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे मुंबई येथे वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. काल त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व छोट्या मोठ्या पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसचा एक नेताही उपस्थित नव्हता. त्यावर विश्वंभर चौधरी यांनी उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, राहूल गांधी व्यस्त असतील हेही समजू शकतो. पण महाराष्ट्रातला काॅग्रेसचा एकही नेता उपस्थित असू नये? असा सवाल चौधरींनी काँग्रेसला विचारला.

विश्वंभर चौधरी म्हणाले, नरेंद्र मोदी दिल्लीतून मुंबईत आले. हायरिस्क असताना शरद पवार आलेत मानेची सर्जरी झाली असतांनाही उद्धव ठाकरेही अंत्यसंस्काराला आले. काँग्रेसचे सर्वोच्च नेते अशावेळी कुठे गायब होतात देव जाणे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading