मुख्यमंत्री व संजय राऊत यांनी मला अडवण्यासाठी महापालिकेमध्ये गुंड पाठवले – किरीट सोमय्या
पुणे: महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचाराचा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमाय्यांची गाडी आडवली व त्यांना घेरले. यावेळी किरीट सोमय्या हे महापालिका इमारतीच्या पायरीवर कोसळले. अन् यामध्ये सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्ता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले, मी काल पुणे महानगरपालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांना पुणेमहापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला या संबंधीची चौकशी करण्यात यावी म्हणून निवेदन द्यायला गेलो होतो. माझ्यावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मला अडवण्यासाठी महापालिकेमध्ये काही गुंड पाठवले होते. असा आरोप किरीट सोमय्यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर केला.
किरीट सोमय्या म्हणाले, पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा केलेल्या लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनी वर गुन्हा दाखल करून याप्रकरणाची चौकशी व्हायलाच पाहिजे. ही माझी मागणी आहे.
भाजप असला गुंडशाही प्रकार खपवुन घेणार नाही.
आम्हीपण शिवसैनिकांना येत्या काळात जसेच्या तशे उत्तर देऊ असे आवाहन किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांना केले.
किरीट सोमय्या म्हणाले,पुणेमहापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी घोटाळा केला असल्यामुळे. तो उघड होणार असल्यामुळे माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला असा आरोपही किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर केला.
