Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

किरीट सोमय्या यांना एक दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवणार -डॉ.पराग संचेती

पुणे: पुणेमहापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचाराचा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमाय्यांची गाडी आडवली व त्यांना घेरले. यावेळी किरीट सोमय्या हे महापालिका इमारतीच्या पायरीवर कोसळले. अन् यामध्ये सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या धक्काबुक्की मध्ये ते महानगरपालिकेच्या पायर्‍यांना पडले होते आणि त्याच्यामुळे ते पाठीच्या आधारे पाठीवर पडला असल्यामुळे त्यांनी उजव्या हाताचा आधार घेतला होता आणि या उजव्या हाताला मुक्का मार लागलेला आहे कुठल्याही भागात प्रेक्षकांचं नाहीये मात्र त्यांना एक दिवस संचेती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात येणार आहे अशी माहिती संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती यांनी दिली.
डॉक्टर पराग संचेती म्हणाले,किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेमध्ये जो हल्ला झालेला आहे त्याच्या मुळे त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे तसेच त्यांच्यावर जो अचानक हल्ला झाला आहे त्याच्यामुळे त्यांचं बीपी अचानक वाढलं होतं संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यानंतर हे बीपी कंटिन्यू वाढलं होतं मात्र आता बीपी कंट्रोलमध्ये आहे मात्र थोडं त्यांना मानसिक धक्का बसल्यामुळे बीपी लक्ष होत आहे. अशी डॉक्टर पराग संचेती म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading