Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

रमाई महोत्सव : विषाच्या पेरणीने संस्कृती डागाळते – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणेः- पंथ, पक्ष, जात, धर्म यांच्या नावाने आज व्देष पेरला जात आहे. पण विषाची पेरणी करून अमृताचे पीक कसे येणार, याचा विचार कोणीच करतांना दिसत नाही. विषाच्या पेरणीने संस्कृती डागाळते, असे मत ज्येष्ठ लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आयोजित देशातील लोकसहभागातील एकमेव अशा रमाई महोत्सवाचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी रामजीबाबा आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. श्रीपाल सबनीस यांना रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक झेन मास्टर सुदस्सन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी सबनीस बोलत होते.पुणेः- पंथ, पक्ष, जात, धर्म यांच्या नावाने आज व्देष पेरला जात आहे. पण विषाची पेरणी करून अमृताचे पीक कसे येणार, याचा विचार कोणीच करतांना दिसत नाही. विषाच्या पेरणीने संस्कृती डागाळते, असे मत ज्येष्ठ लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर ललिता सबनीस, रमाई महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

वाडिया कॉलेज समोरील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित या महोत्सवात सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी पर्यंत रोज संध्याकाळी विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोधी वृक्षाला पाणी अर्पण करून करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, संस्कृतीच्या प्रवाहात मातृत्वाचा सन्मानआवश्यकच आहे, पण ‘बापपणाची’ उपेक्षा समर्थनीय म्हणता येणार नाही. डॉ. आंबेडकरांसारखा महापुरूष ज्या रामजी आंबेडकरांनी जन्माला घातला, त्या बापाचा सन्मान ऐतिहासीक ठरणारा आहे. रामजी आंबेडकर हे सैनिकी शिक्षक म्हणून सात्विक आणि सोज्वळ जीवन जगले. संतांची अभंगवाणी त्यांनी पचवली आणि मुलांवर संस्कार केले. रामजी बाबांनी नव्या युगाला म्हणजे भिमरावांना जन्म दिला. रामजी बाबा हिंदू उपनिषदातील संतत्वाने संस्कारीत झालेल होते. कबीर आणि रामानंदाची पदे ते गात असत. त्याच संतवाणीने बाबासाहेब प्रभावीत होते. रामजीबाबा लहानपणी भिमरावांना अभ्यासासाठी पहाटे उठवत असत. तेच अभ्यासू बाबासाहेब पुढे विव्दान झाले. रामजीबाबांचे हे योगदान अतिशय पायाभूत आहे.जसे शहाजी राजांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार करता येत नाही, त्याचप्रमाणे रामजीबाबांशिवाय डॉ.भिमराव आंबेडकरांचा विचार करता येणे शक्य नाही. रामजीबाबांच्या संतवाणीतून भिमराव मोठे झाले आणि पुढे बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि तुकारामांचे अभंग त्यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. उपनिषदाची समता आणि बुद्धाची करूणा यांचा सुसंवाद रामजीबाबा आणि बाबासाहेब यांच्या अनुबंधाचे मूल्य स्पष्ट करतो. रामजीबाबा आणि बाबासाहेब यांनी नाळ हिंदू-बौद्धाच्या समान संवादी सहजीवनासाठी मार्गदर्शक ठरते. भिन्न भूमिका आणि भिन्न धर्मांच्या जीवनांचे सहअस्तित्व आज महत्त्वाचे आहे. याच धर्म संवादातून विश्वशांती सिद्ध होईल. संपूर्ण जगाचे कल्याण 3-4 महापुरूषांनी कसे होणार हा प्रश्नच आहे. त्यासाठी सर्व संत आणि महापुरूषांची संवादी बेरीज आवश्यक आहे. मनुष्यत्व अपूर्ण आहे, देवत्व स्वप्न आहे आणि संतत्व वास्तवातील ध्येयवाद आहे.

यावेळी रमाई महोत्सवाचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
रमाई महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले, तर विठ्ठल गायकवाड यांनी आभार मानले.

Leave a Reply