एसआरए अंतर्गत घोरपडी येथील डोबरवाडीचा विकास करून सदनिका बांधून देण्यात यावी – हुलगेश चलवादी
पुणे : एसयआरस अंतर्गत घोरपडी येथील डोबरवाडी ही लोकवसाहत असून त्या ठिकाणी कर्नाटक राज्यातील अनुसूचित जाती व जमातीचे जवळजवळ 200 कुटुंबे गेली 50 वर्षांपासून रहात आहे. त्यांच्याकडे एसआरए योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभाकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे आहे. तसेच सन 1984 साली महाराष्ट्र राज्य राजपत्राद्वारे गवनी घोषित करण्यात आली आहे. सदर वस्तीलगत राहणारे कवडे व इतर बिल्डरांमार्फत कोर्ट, प्रशासनाची व इतर सरकारी कार्यालयाची दिशाभूल करून येथील सर्व कुटुंबाना बेघर करण्याचा डाव असून संबंधित लोकांवर अत्याचार व आन्याय होत आहे. त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी पुणे व पिंपरी चिंचवड झोपडपट्टी प्राधिकरण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी वैशाली इंदनीकर (उंटवाल) यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी बसपा जिल्हा सचिव शफी शेख, साळवी, मोजेस एरिकेरूर,अनिल पुजारी, हणमंत हनगळ, विलास हनगळ, आगस्तीयन एरिकेरूर, संदीप पुजारी, स्वप्नील एरिकेरूर, सूरज मुदगळ आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी त्वरित प्रत्साव दाखल करून इतर वस्त्याप्रमाणे न्याय देण्याची भूमिका घेण्यात येईल असे सांगितले आहे.
