गूगल कडून ‘परेड डूडल’सह भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा
मुंबई : आज (दि. 26 जानेवारी) देशात सर्वत्र भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. गूगलनही 73 वर्षांपूर्वीच्या ‘या’ दिवसाचे स्मरण करत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील घटकांचे चित्रण करीत आकर्षक ‘परेड डूडल’ साकारत भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाने आपली राज्यघटना स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अधिकृतपणे लागू करण्यात आली. राजपथ येथे आज प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताचे लष्करी सामर्थ्य तसेच समृद्ध सांस्कृतिक वैविध्य दाखवले गेले. त्याच प्रमाणे डूडल परेडमध्येही विविध घटक दर्शवण्यात आले आहेत. यामध्ये डावीकडून हत्ती, घोडा, कुत्रा, उंट; लाल तबला; परेड मार्ग; आयकॉनिक कॅमल-माउंटेड बँडचा भाग म्हणून सॅक्सोफोन; कबूतर आणि राष्ट्रध्वज आहे.
