Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मकरसंक्रांती निमित्त महिलांना साड्या व पर्स वाटप

पुणे: राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे शहर महिला उपाध्यक्ष सुनीता ताई किरवे यांच्या वतीने धनकवडी येथे हळदी -कुंकू व मकरसंक्रांती निमित्त महिलांना साड्या व पर्स वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी सुमारे 1200 महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सेविका राधिका मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमानिमित्त संक्रात सणाचे महत्व विविध प्रांतामध्ये संक्रात सण साजरा करण्याची पद्धतीची माहिती यावेळी देण्यात आली तसेच महिलांनी स्वतःला अबला समजू नये स्वतःला सक्षम बनवावे त्यामुळे आपले कुटुंब समाज व पर्यायाने देश सक्षम होईल जीवनाचे मर्म व अध्यात्म याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले यावेळी गायक कवी शरद शेजवळ यांनी आपले मौलिक विचार मांडले. 

आजपर्यंत महिलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असून यापुढील काळात देखील महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काम करणार असल्याच राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर महिला उपाध्यक्ष सुनीता किरवे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुनीता  किरवे ,श्रद्धा कदम, शोभा साळुंके ,वर्षा शिंदे ,शोभा बोडके ,धनश्री कानडे, वैशाली जाधव ,नयन चव्हाण व मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली

Leave a Reply