मुंबई, पुण्यासह राज्यात काही भागात 23 आणि 24 जानेवारीला पावसाची शक्यता
पुणे:महाराष्ट्रात अनेक भागात ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह काही भागात 23 आणि 24जानेवारीला पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झालेली यला मिळत आहे. तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमानात घट झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत पडला आहे.
23 जानेवारी आणि 24 जानेवारीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उद्या रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तर परवा जानेवारीला चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी 23 जानेवारीनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार आहे. हा थंडीचा गारठा दोन दिवस कायम असणार आहे.
